Pracheen Bharatiya Khagolvidnyan | प्राचीन भारतीय खगोलविज्ञान
लेखक: नीलेश ओक, रूपा भाटी, लीना दामले
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: 142
MRP: ₹200
‘भारतविद्या’ अर्थात ‘इंडॉलॉजी’ हा विषय अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांसाठी नेहमीच कुतूहलाचा ठरलेला आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या माहितीविषयी बहुसंख्य वाचकांना उत्सुकता असतेच, त्यामुळेच पुस्तके, व्याख्याने, इंटरनेट अशा विविध माध्यमांतून प्राचीन संस्कृतीतील ज्ञानाचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न जगभरातले अभ्यासक- वाचक करत असतात.
प्रस्तुत पुस्तकात रामायण आणि महाभारत या मानवजातीच्या ‘इतिहास ग्रंथां’तील खगोलशास्त्रीय पुराव्यांची थोडक्यात मांडणी केली आहे; ऋग्वेद, सूर्यसिद्धान्त आदी ग्रंथांसोबतच नद्यांचा भूगोल आणि त्यांच्या प्रवाहातील बदलांचा अभ्यास, प्राचीन वास्तूंचा अभ्यास यातून भारतीय ज्ञानसंस्कृतीचा आवाका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव करून देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. इंडॉलॉजीच्या अभ्यासातील रूढीवादी दृष्टिकोनापासून मुक्त होऊन, प्राचीन भारतीय ज्ञानविश्वाचा अभ्यास मुळातून करण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन प्राचीन भारतीय खगोलशास्त्र या पुस्तकामुळे मिळते.
Publisher: Sakal Prakashan |
Language: Marathi |