Made In China | मेड इन चायना
मेड इन चायना
लेखक: गिरीश कुबेर
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: 260p
MRP: ₹450
जवळजवळ साडेतीन हजार वर्षांचा लिखित इतिहास असणाऱ्या आणि आज महासत्ता होऊ घातलेल्या चीनबद्दल फार पूर्वीपासूनच आकर्षण होतं. न कळत्या वयात महान वाटणारा माओ-कम्युनिझमचं वैचारिक वेगळेपण, चीनने ओढून घेतलेला बांबूचा पडदा, ग्रेट लीप फॉरवर्ड आणि सांस्कृतिक क्रांतीची तुटपुंज्या माध्यमांच्या ओंजळीतून मिळालेली प्रचारकी माहिती, १९६२चं भारत-चीन युद्ध, ९० च्या दशकाच्या शेवटी जगभरात उलथापालथ होत असताना मनावर कोरली गेलेली तिआनानमेन आंदोलनाची दृश्यं अशा अनेक तुकड्यांनी चीनबद्दलचं काहीसं अतिरंजित चित्र मनात तयार झालं होतं. चीन हाच भारताच्या महासत्ता बनण्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा असणार आहे, हे लक्षात आल्यावर चीनबद्दल सर्व अंगांनी जास्तीतजास्त समजून घेतलं पाहिजे असं जाणवू लागलं. चीनचा इतिहास, कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आल्यावर चीनने राबवलेली सामाजिक धोरणं, एका टप्प्यावर त्याने स्वीकारलेलं आर्थिक धोरण, गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्ये केलेली अभूतपूर्व प्रगती, इतिहास आणि वर्तमानाबद्दल असणाऱ्या आत्मविश्वासातून तयार होत गेलेलं चीनचं परराष्ट्र धोरण आणि जिओ-पॉलिटिक्स, चीनपासून भारताला असणारे भविष्यातले धोके या सगळ्यांच्या अतिशय सखोल अभ्यासातून हे पुस्तक जन्माला आलं.
- लेखक, मनोगतातून
Language: Marathi, English |
Generes: History, Medical Science, Medical Science |
Binding: Paperback |
Author: Nilesh Oak, Rupa bhati, Lina Damle |